तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से! सोनिया गांधी यांच्यावरील कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक

 

ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बुधवारी सलग दुसऱया दिवशी चौकशी सुरू करताच काँग्रेसने देशभर तीव्र आंदोलन करीत ईडीच्या कारवाईचा निषेध केला. या विरोधात दिल्लीत खासदार व इतर नेत्यांनी सत्याग्रह केला, तर मुंबईसह इतर प्रमुख शहरांत नेत्यांसह मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला. यावेळी केद्रातील मोदी सरकारविरोधात ‘तब लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से…’ अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली.

ईडीकडून ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई, नवी मुंबईसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरशः रान उठवले. रस्त्यावर उतरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी या कारवाईविरुद्ध जोरदार निदर्शने केली. बोरिवलीत रेल्वे ट्रकवर उतरून त्यांनी सौराष्ट्र मेल रोखून धरली. देशभरात हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱया नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार करण्यात आला.

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाची फाईल पुन्हा बाहेर काढत ईडीने गांधी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली आहे. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तब्बल ५० हून अधिक तास चौकशी केली. त्यानंतर सोनिया गांधी यांची दोनवेळा चौकशी केली आहे. ईडीच्या या कारवाईविरुद्ध काँग्रेसने देशभर तीव्र आंदोलन छेडले. मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकात बुधवारी सकाळी सौराष्ट्र एक्स्प्रेस काही वेळ रोखून धरली. शीव-कोळीवाडा येथेही काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी आमदार भाई जगताप व इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आले.

बीएसएनएलसाठी १.६४ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला कॅबिनेटची मंजुरी

प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी! माजी मंत्र्यांच्या कॉलेजमध्ये घडला प्रकार

Team Global News Marathi: