अर्पिता मुखर्जींच्या दुसऱ्या फ्लॅटवर बेहिशेबी संपत्तीचा महापूर, नोटा भरायला मागवावे लागले 20 ट्रक

अर्पिता मुखर्जींच्या दुसऱ्या फ्लॅटवर बेहिशेबी संपत्तीचा महापूर, नोटा भरायला मागवावे लागले 20 ट्रक

अर्पिता मुखर्जींच्या घरी पुन्हा ईडीची धाड  |  फोटो सौजन्य: Times Now

Arpita Mukharjee ED raid : 29 कोटींची कॅश (29 crore cash), 5 किलो सोनं (5kg gold) आणि इतर मौल्यवान वस्तू अशी 51 कोटी रुपयांची (51 crore) बेहिशेबी मालमत्ता पाहून ईडीचे अधिकारीही (ED officers) चक्रावून गेले. पश्चिम बंगालमधील (West Bengal) शिक्षक भरती घोटाळाप्रकऱणी (Teacher recruitment scam) अर्पिता मुखर्जी (Arpita Mukharjee) यांच्या दुसऱ्या फ्लॅटवर (Second Flat) ईडीने धाड टाकून ही माया ताब्यात घेतली. एकाच जागी ठेवलेली एवढी प्रचंड संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचेही डोळे विस्फारले.

20 ट्रक नोटा

अर्पिता मुखर्जी यांच्याकडे सापडलेल्या नोटा घेऊन जाण्यासाठी ईडीला 20 ट्रक मागवावे लागले. दोन हजार आणि पाचशे रुपयांचे हे बंडल मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांना कित्येक तास लागले. मुखर्जी यांच्या फ्लॅटवरील अख्खा माहोल 2000 रुपयांच्या नोटांमुळे गुलाबी झाला होता. अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यासाठी कित्येक मशीन्स मागवावी लागली. त्याचप्रमाणे नोटा भरण्यासाठी काही गोण्यादेखील मागवाव्या लागल्या. नोटा मोजता मोजता मशीनदेखील धापा टाकून लागलं आणि हँग होऊ लागलं. कित्येक तासांच्या मोजणीनंतर नेमकी किती संपत्ती या ठिकाणी आहे, याचा अंदाज ईडीच्या अधिकाऱ्यांना येऊ शकला.

लॉक तोडून टाकली धाड

अर्पिता मुखर्जी यांचा हा फ्लॅट बंद होता. त्यामुळे त्यात प्रवेश कसा मिळवावा, हा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर होता. अखेर लॉक तोडून या फ्लॅटवर धाड टाकण्यात आली. एक्सपर्टना बोलावून कुलूप तोडण्यात आलं आणि धाड टाकण्यात आली.

कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती 

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात आतापर्यंत ईडीनं कोट्यवधी रुपयांची संपत्ती अर्पिता मुखर्जी यांच्या दोन वेगवेगळ्या फ्लॅटवरून जप्त केली आहे. पहिल्या धाडीत जप्त केलेले 21.9 कोटी रुपये,  दुसऱ्या धाडीत आतापर्यंत 51 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

कोण आहेत अर्पिता मुखर्जी?

सध्या पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळाप्रकऱणी कॅबिनेट मंत्री पार्थ चॅटर्जी ईडीच्या रडारवर आहेत. अर्पिता मुखर्जी या त्यांच्या निकटवर्तीय आहेत. पश्चिम बंगालमधील महत्त्वाचे नेते आणि ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी हे एक दुर्गापूजा मंडळ चालवतात. त्यांच्या मंडळाकडून दरवर्षी मोठ्या थाटामाटात दूर्गापूजा सोहळ्याचं आयोजन कऱण्यात येतं. कोलकात्यातील नामांकित दूर्गापूजा मंडळांपैकी हे मंडळ आहे. 2019 आणि 2020 अशी दोन वर्षं अर्पिता मुखर्जी या पार्थ चटर्जींच्या दूर्गापूजा सोहळ्याचा चेहरा बनल्या होत्या.

विविध पोस्टरवर त्यांचा फोटो झळकला होता आणि त्या माध्यमातून चटर्जी यांच्याशी त्यांची ओळख झाली. चटर्जी हे या मंडळाचे अध्यक्ष होते आणि मुखर्जी या मंडळाच्या एक प्रकारे ब्रँड अम्बेसेडर म्हणून कार्यरत होत्या. अर्पिता मुखर्जी यांनी करिअरच्या सुरुवातीला बंगाली सिनेसृष्टीत काम केलं. काही चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. मात्र त्यांचं चित्रपटातील करिअर फार मोठं होऊ शकलं नाही. काही सिनेमांमध्ये साईड रोल करण्यापर्यंतच त्या मजल मारू शकल्या. ओडिया आणि तमीळ सिनेमांतही त्यांनी काही भूमिका केल्या.

दोघांच्याही फोन रेकॉर्डचा तपास

पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांचे कॉल रेकॉर्ड्स सध्या ईडी तपासत आहे. दोघांच्याही नंबरवरून एका विशिष्ट नंबरला अनेकदा फोन कॉल केले गेल्याचं ईडीच्या तपासाता आतापर्यंत दिसून आलं आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्यामुळे या प्रकरणाकडे आता बंगालसोबत संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: