नांदेड | माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शारदा भवन शिक्षण संस्थेतील प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यशवंत महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी प्राध्यपकांनी आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली होती.
समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेतील एका प्राचार्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड मधील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी महिला प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. तशी तक्रार पीडित महिलेने केली आहे.
त्यावरून नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या श्री शारदा भवन शिक्षण संस्थेतील यशवंत महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्राचार्य सातत्याने अश्लील बोलून त्रास देत होते. पण, आता थेट त्यांनी हात धरून शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यास अन्य ठिकाणी बदली करू अशी धमकी दिली. अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. त्यावरून शिवाजी नगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
माजी मंत्र्यांच्या शिक्षण संस्थेतच धक्कादायक घटना महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेत ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. या संदर्भात अद्याप अशोक चव्हाण यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र, अशोक चव्हाण काय कारवाई करतात? याकडेही आता लोकांचं लक्ष लागलं आहे.
केमिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला पाच कैद्यांनी केली मारहाण
आमदार रोहित पवार यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, मात्र कारण अद्याप गुलदस्त्यात