महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून अंधारातील जनतेला प्रकाशात आणले, पण त्यांच्याच नावाचा फलक अंधारात

 

मुंबई । छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आज सर्वच पक्ष त्यांच्या नावाने राजकारण करताना दिसून येतात. आज त्यांच्या नावावर अनेक पक्ष सत्तेत रूढ झाले आहे मात्र आता याच सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडला की काय ? असेच चित्र दिसून येत आहे असा मुद्धा थेट मनसे विभाग अध्यक्ष चेंबूर विधानसभा श्री. माऊली थोरवे यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात ते ट्विटमध्ये म्हणतायत की, चेंबूर पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार फलक अंधारात ❓️महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून अंधारातील जनतेला प्रकाशात आणले, त्यांच्या नावावर आपण राजकारण करतो पण त्यांच्याच नावाचा फलक अंधारात आहे याकडे कोण लक्ष्य देणार का ❓ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

आज संपूर्ण मुंबईत रोषणाई करण्यासाठी मुंबई मनपा कोटी रुपये खर्च करत असताना मात्र चेबूर पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची लाइट अनेक दिवसांपासून बंद असताना मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह त्यांची देखभाल करणाऱ्या मुंबई मनपाला सुद्धा ते दुरुस्त करण्याचा विसर पडला आहे असा सवालच त्यांनी उपस्थित केला आहे .

Team Global News Marathi: