राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून पुढचे काही तास महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना ढगांच्या गडगडाचा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, नबरनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या ३ ते ४ तासांत जळगाव, रायगड, रत्नागिरी, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुढच्या ३-४ तासामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.

आज हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

खरंतर, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, कोकण, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामांना वेग आला असून बळीराजा आता सुखावला आहे. हाच पाऊस पुढच्या काही दिवसांमध्ये असाच सक्रिय राहिल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

साभार मटा ऑनलाइन

ग्लोबल न्युज नेटवर्क: