एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? – सामनामधून सवाल

एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? – सामना

सिनेअभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्या प्रकरणी एम्सने अहवाल काल सीबीआयकडे सुपूर्त केला. या अहवालानुसार सुशांतची हत्या झाल्याचे साफ नाकारण्यात आले आहे. असा अहवाल एमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सीबीआय अधिकारन्यानदे सुपूर्त केला आहे. आता या आलेल्या अहवालावर आजच्या सामना अग्रलेखातून सुशांतच्या परिवाराला आणि भाजपा नेत्यांना टोला लागवण्यात आला आहे.

‘मृत्यूनंतर एखाद्याचे धिंडवडे निघू नयेत म्हणून सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी नैतिकता व गुप्तता दाखवली. सीबीआयने मुंबईत येऊन तपास सुरू करताच सुशांतचे ‘गांजा’, ‘चरस’ प्रकरण बाहेर काढले. सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र समोर आले. बिहारच्या पोलिसांना तपासात हस्तक्षेप करू दिला असता तर कदाचित सुशांत व त्याच्या कुटुंबाचे रोजच धिंडवडे निघाले असते. त्यासाठी बिहारने व सुशांतच्या कुटुंबाने मुंबई पोलिसांचे आभारच मानायला हवेत असे मत शिवसेनेनं व्यक्त केले आहे.

मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांना म्होरक्या करून इतर दोन पक्षांची बघ्याची भूमिका – रावसाहेब दानवे

आता एम्सच्या अहवालातून सुशांतने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या अहवालामुळे सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करणारे आता टीकेच्या रडारवर आले आहे. यावरच आजच्या सामनातून विरोधीयांचा समाचार घेण्यात आला आहे. ‘सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य बाहेर आले आहे. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर अनेक गुप्तेश्वरांना महाराष्ट्रद्वेषाचा गुप्तरोग झाला होता; पण शंभर दिवसांनंतरही शेवटी हाती काय लागले? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.

ही चेतावणी समजा नाहीतर विनंती, खासदार संभाजीराजे आक्रमक

ग्लोबल न्युज नेटवर्क: