आमदार आणि जिल्हा अध्यक्षांना प्रतिज्ञापत्राचे टार्गेट

मुंबई : अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. आता अजित पवार गटाकडून पक्षावर दावा केला जात आहे.

3र

अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केल्यानंतर त्यावर आयोगाने शरद पवार यांना नोटीस पाठवून म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांना नोटीस बजावताच उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागले आहेत.

अजित पवार यांनी थेट प्रतिज्ञापत्रे जमा करण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. अजित पवार यांनी आमदार आणि जिल्हा अध्यक्षांना प्रतिज्ञापत्राचे तयार करण्याचे टार्गेट दिसले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: