ही चेतावणी समजा नाहीतर विनंती, खासदार संभाजीराजे आक्रमक
कित्येक मराठ्यांच्या पोरांना नोकरीच्या नियुक्तीसाठी ऑर्डर मिळाली आहे. मात्र, कामावर घेतले जात नाही. अशी परिस्थिती आहे. मराठ्यांना आरक्षण मिळेलच. परंतु तुमच्या हातात जे आहे ते आधी करा. याला चेतावणी समजा अगर विनंती, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ठणकावून सांगितले. कोल्हापूर येथे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित न्यायिक परिषदेत खासदार संभाजीराजे बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नवेर न्यायिक लढाई लढण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला युवराज संभाजीराजे छत्रपती, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील राजेंद्र दाते-पाटील, अॅड. आशिष गायकवाड, राजेंद्र टेकाळे यांच्यासह कोल्हापूर व अन्य पाच जिल्ह्यांतील ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.
मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांना म्होरक्या करून इतर दोन पक्षांची बघ्याची भूमिका – रावसाहेब दानवे
पुढे बोलताना राजे म्हणाले की, नोकरीबाबत वकिलांनीही सरकारला जाब विचारावा. शिवाय २०१४ ते २०२० पर्यंत नियुक्त्या का झाल्या नाहीत? यावर सरकारविरोधात याचिका दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी असे ही पुढे राजेंनी म्हणून दाखविले.