अशोक चव्हाणांना म्होरक्या करून इतर दोन पक्षांची बघ्याची भूमिका – रावसाहेब दानवे
मराठा आरक्षणाच्या संदर्भात माजी मुख्यमंत्री व घडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांना म्होरक्या करून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने गंमत बघण्याचे काम केले आहे अशी टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. दानवे यांच्या भोकर येथील निवासस्थानी मराठा संघटनांनी आरक्षणसाठी धारणा दिला होता यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते बोलता होते.
पुढे बोलताना दानवे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आणि अधिपासून स्पष्ट भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. तामिळनाडूमधील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक असून या संदर्भातील प्रकरण पूर्ण पीठाकडे सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने तेथील आरक्षणास स्थगिती दिलेली नाही.
देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र
मराठा आरक्षणाचा विषय पूर्णपीठाकडे सोपविताना या आरक्षणास मात्र स्थगिती दिलेली आहे. आघाडी सरकारने आपली बाजू नीट मांडायला हवी होती. मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन वकिलांची फौज उभी करून आरक्षण टिकवायला पाहिजे होते असे मंत्री दानवे यांनी बोलून दाखविले.
उत्तर प्रदेश मध्ये महिला पोलीस नाहीत ? संजय राऊतांचा योगी सरकारवर पुन्हा निशाणा