बाहुबली फेम ‘ या ‘अभिनेत्रीला कोरोनाची लागण , रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाची  कोविड-१९ टेस्ट पॉझिटिव्ह  आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तमन्ना भाटिया आपल्या आगामी वेब-सीरिजच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होती आणि त्याच दरम्यान तिला कोरोनाची लक्षणे आढळली असता कोविड टेस्ट करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री तमन्ना भाटियाला उपचारासाठी हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त सोशल मीडियात पसरताच तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना सुरू झाल्या. तसेच लवकरात लवकर कोरोनावर मात करुन बरी होण्यासाठी चाहत्यांकडून ट्वीटरवर गेट वेल सून मेसेजसह प्रार्थना होत आहेत.


मराठा आरक्षण : अशोक चव्हाणांना म्होरक्या करून इतर दोन पक्षांची बघ्याची भूमिका – रावसाहेब दानवे


ऑगस्ट महिन्यात अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या आई-वडिलांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि याची माहिती स्वत: अभिनेत्रीने सोशल मीडियात दिली होती. तमन्नाने ट्वीट करत म्हटलं होतं, “माझ्या आई-वडिलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली होती आणि त्यानंतर आम्ही चाचणी केली असता दुर्भाग्याने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे”. तमन्नाच्या आई-वडिलांना कोरोनावर मात केली आहे.

एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय? – सामनामधून सवाल

तमन्नाच्या आई-वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर घरातील इतर सदस्य आणि कर्मचाऱ्यांचीही चाचणी केली होती, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. अभिनेत्री तमन्नाचा रिपोर्टही त्यावेळी निगेटिव्ह आला होता. पण आता आगामी प्रोजेक्टच्या शूटिंग दरम्यान तमन्नाला कोरोनाची लक्षणे आढळून आली आणि टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

हैदराबादला जाण्यापूर्वी अभिनेत्री तमन्नाला मुंबईतील एका सलूनमध्ये पाहिलं गेलं होतं. वर्कफ्रंटचं बोलायचं झालं तर अभिनेत्री तमन्नाकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. अभिनेत्री तमन्नाने दाक्षिणात्य सिनेमांसोबतच अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका केली आहे. ज्यामध्ये बाहुबली या सुपरहिट सिनेमाचाही समावेश आहे.

देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: