सेक्स आणि पती-पत्नीचं नातं ; वाचावे असे काहीतरी

सेक्स आणि पती-पत्नीचं नातं
विलास पवार

सेक्स हा वैवाहिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सेक्स हा पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करतो. प्रेम वाढवितो. दोन जिवांमध्ये ओढ निर्माण करतो. वैवाहिक जीवनात प्रत्येक दाम्पत्याला सेक्ससाठी समाजमान्यता मिळत असली तरी त्याचे काही अलिखित नियम आहेत. सेक्सचा स्वैराचार होणार नाही. आपल्या जोडीदाराचे दमण वा शोषण होणार नाही. त्याचे प्रदर्शन वा विडंबन होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. साधारणपणे सेक्स हा संस्कृती, संस्कार, बंधन, सामाजिक नियम याच्यात बंदिस्त झालेला असतो. सेक्स हा सार्वजनिक ठिकाणी होत नाही. त्यासाठी एकांत गरजेचा असतो. त्यामुळे त्याची नेहमीच गोपनीयता पाळली जाते.

एकंदरीत शारिरीक संबंध हा पती- पत्नी यांच्या दोघातला विषय असतो. त्यामुळे या प्रक्रियेत परस्परांना समजून घेणे वा त्यात जाणवणार्या समस्या संवादातून सोडविणे गरजेचे असते. सेक्स ही शारीरिक भूक मानली जाते. शारीरिकदृष्ट्या आणि मनानेही एकत्र आल्याशिवाय सेक्स पूर्ण होत नाही.

विवाह झाला की, दोघांमध्ये प्रेम होते, सहवास वाढतो. आकर्षण वाढत जाते. मनात मन गुंतत जाते. भावना उत्कट होत जातात. ईच्छा प्रकट होतात. त्यातून सेक्सची प्रक्रिया सुरळीत होत जाते. सेक्स ही शारीरिक क्रिया असली तरी मन, भावना, ईच्छा, होकार, नकार याचाही प्रभाव आणि परिणाम शारीरिक संबंधांवर होत असतो. चुंबन, आलिंगन, मिलन आदी टप्प्यातून त्याची पुर्तुता होते.विवाहानंतर एकत्र आलेल्या पती-पत्नीमध्ये होणारा सेक्स हा रितसर मानला जातो.

संसाराची उभारणी करणार्‍या घटकांपैकी तो एक महत्त्वाचा घटक असतो. त्या मिलनातून दोन जिवांची शारिरीक भूक भागतेच, मात्र आई-बाबा होण्याचे स्वप्नही त्यात लपलेले असते. वैवाहिक जीवनात सेक्सला खूप महत्त्व आहे. पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करणारी ती एक शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया आहे.

सेक्सबाबत दोघांचे समाधान होत असेल, दोघांना आत्मिक आनंद मिळत असेल तर वैवाहिक जीवन अधिक बहरत जाते. फुलत जाते. मात्र त्यात एकमेकांना समजून घेतले जात नसेल तर संसाराची नौका हेलकावे खाण्याची दाट शक्यता असते. इच्छेविरुद्ध , बळजबरीने, एकमेकांवर अविश्वास दाखवून होणारा अथवा अपुर्ण ज्ञानावर आधारित सेक्स हा सुखी संसाराची राखरांगोळी करू शकतो.

संसारात कटकटी घालू शकतो. वादविवाद विकोपाला नेऊ शकतो. घटस्फोटापर्यंत पोहचवू शकतो. म्हणून पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी दोघांनी यासाठी परस्परांना समजून घेतलं पाहिजे. ईतर गोष्टींना जसा आपण वेळ देतो, तसा सेक्सलादेखील वेळ दिला पाहिजे. सेक्स संदर्भात एकमेकांच्या ईच्छा -अपेक्षांना स्थान दिले पाहिजे. आयुष्य जगताना अन्न, वस्त्र, निवारा, पैसा, शिक्षण, नोकरी, पद, प्रतिष्ठा या गोष्टीची जशी गरज असते, तेवढीच गरज सेक्सची सुध्दा वैवाहिक जीवनात आहे. विवाह झाल्यापासून तर अगदी व्रुध्दत्वाकडे झुकलेल्या वयातही पती-पत्नी सेक्सचा आनंद लुटू शकतात.

पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’कडे चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला

पती-पत्नीच्या नात्यातील सेतू बनून मनाने आणि शरीराने एकत्र बांधून ठेवण्याचे काम सेक्स करीत असतो. पती-पत्नीचं नातं फुलवित असतो. सेक्स हा शारीरिक भूक भागवितो, तसा प्रेमाची पेरणी करीत असतो. पती पत्नीमध्ये या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर खुली आणि मनमोकळी चर्चा झाली पाहिजे.

उणीवा वा दोष जाणवले तर संवाद झाला पाहिजे. काही दाम्पत्य संसारीक वाटचालीत खूप कष्ट करतात, पैसा कमावतात, आपली स्वप्ने साकारण्यासाठी रक्ताचे पाणी करतात मात्र सेक्सकडे फारसे लक्ष देत नाहीत. सेक्स ही आपली आणि आपल्या जोडीदाराची शारीरिक गरज आहे, याबाबत विचार केला पाहिजे. या विषयावर खुलेपणाने दोघांमध्ये चर्चा होत राहिल्या पाहिजे. यातून पती-पत्नीमध्ये समर्पणाची भावना वाढीस लागते.

देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

……………. ……………………………………….
मी या विषयातला तज्ज्ञ वा अभ्यासक नाही. मात्र संसार तुटण्याच्या इतर कारणांसोबत सेक्समधील अडथळे वा त्यासंदर्भात एकमेकांविषयीचे समज -गैरसमज ही देखील कारणे असू शकतात. अशा काही घटना घडताना दिसतात वा बातम्या वाचायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवर हे विवेचन मांडले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: