राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – (Todays Horoscope) वार – गुरुवार 07.09.2023. शुभाशुभ विचार-उत्तम दिवस. आज विशेष- गोपाळकाला राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00  दिशा शूल – दक्षिणेस असेल. आजचे नक्षत्र- रोहिणी 10.25 पर्यंत, नंतर मृग. चंद्र राशी – वृषभ 23.23 पर्यंत नंतर मिथुन.
——————————–


मेष – ( शुभ रंग- लाल )
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल असेल.

वृषभ (शुभ रंग- क्रीम )
आज तुमचे मनोबल उत्तम असून तुमची सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आज तुम्ही रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर राहाल.

मिथुन (शुभ रंग- राखाडी )
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा मोठा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणार नाही. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे सतर्क रहा.

कर्क (शुभ रंग- हिरवा)
कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र आज तुमचा शब्द झेलतील. काही खोटी स्तुती करणारे भेटतील. संततीचे विवाह योग जुळून येतील.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

कन्या ( शुभ रंग- मरून)
दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने कार्यक्षेत्रात आज तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना हमखास यश मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. मन प्रसन्न राहील.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)
आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हातचे सोडून पळत्या मागे धावणे योग्य ठरणार नाही. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. आज ताकही फुंकुनच प्या.

वृश्चिक (शुभ रंग- सोनेरी)
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.

धनु- (शुभ रंग- निळा)
आज कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती अनपेक्षित पणे वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मकर ( शुभ रंग- राखाडी )
कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज मनसोक्त स्वतःचे लाड करण्यासाठी पैसा खर्च कराल.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्हाला कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नात लक्ष देणेही गरजेचे आहे. गृहिणींना आज मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागेल.

मीन -(शुभ रंग – जांभळा )
शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन एकोपा वाढेल. काही जणांना अचानक काही जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रोधावर लगाम असावा.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

ग्लोबल न्युज नेटवर्क: