राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग -Today’s Horoscope 10 September 2023
वार – रविवार
10.09.2023
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष- अजा एकादशी.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- पुनर्वसू 17.17 पर्यंत नंतर पुष्य
चंद्र राशी – मिथुन 10.25 पर्यंत नंतर कर्क.
——————————–


मेष – ( शुभ रंग- मेष )
बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या घरगुती कामात आज लक्ष घालाल. गृहिणींचे गृह उद्योग तेजीत चालतील. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. आनंदी दिवस.

वृषभ (शुभ रंग- जांभळा )Today’s Horoscope 10 September 2023
आज तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आज तुम्ही आत्मविश्वासाने स्वीकाराल. वाणीत गोडवा ठेवून अनेक किचकट प्रश्न सहज मार्गी लावता येतील.

मिथुन (शुभ रंग- मोतिया )
महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्याच मतावर अडून राहाल. अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकतो. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. सुसंवाद गरजेचा आहे.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नवीन व्यवसायात आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. ज्येष्ठ मंडळींनी आज हाती असलेली पुंजी जपून वापरावी. सत्संगातूनच मानसिक शांती मिळेल.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

कन्या ( शुभ रंग- लाल)
नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळायला हवा. कायद्याच्या चौकटीतच रहा.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. विरोधक तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच केलेला बरा. उपासनेत खंड पडू देऊ नका.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. आज तुमची तब्येतही थोडी नरमच राहील. पती-पत्नी मधील वादावर मौन हा रामबाण उपाय ठरेल.

धनु- (शुभ रंग- भगवा)
नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. अधिकार योग चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम करा. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

मकर ( शुभ रंग- पिस्ता )
ध्येयप्राप्तीसाठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. काही येणी असतील तर मागायला लाजू नका गृहिणीसाठी आज अतिव्यस्त दिवस आहे.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी)
नोकरदार वरिष्ठांच्या मागे पुढे करत राहतील. कलाकारांच्या उमेदवारीला यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत आज चांगलीच सुधारणा दिसून येईल.

मीन -(शुभ रंग – सोनेरी )
घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. आज सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आनंदी व उत्साही दिवस. कलेच्या क्षेत्रातील मंडळींना मात्र स्ट्रगल वाढवावी लागेल.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: