राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – (Todays Horoscope) वार – मंगळवार. 05.09.2023 . शुभाशुभ विचार- 9.00 पर्यंत चांगला दिवस. आज विशेष- साधारण दिवस. राहू काळ – दुपारी 3.00 ते 4 .30 . दिशा शूल – उत्तरेस असेल. आजचे नक्षत्र – भरणी 9.00 पर्यंत नंतर कृतिका. चंद्र राशी – मेष 15.01 पर्यंत नंतर वृषभ.
—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )
आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आवक उत्तम असताना बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील.

वृषभ (शुभ रंग- क्रीम )
कार्यक्षेत्रात दुपारनंतर अनुकूलता वाढेल. तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. एखादी गहाळ झालेली वस्तू आज दुपारनंतर सापडेल.

मिथुन ( शुभ रंग- हिरवा )
सर्व महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून टाका. आज संध्याकाळी काही जुनी मात्र मंडळी भेटतील. मॉलमध्ये फेरफटका मारून अनावश्यक खर्च कराल.

कर्क (शुभ रंग- लाल)
कार्यक्षेत्रात काही मनासारख्या घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील खिशात पैसाही खेळता असेल प्रतिष्ठित लोकांमधील उडवस व्यवसाय वृद्धीच्या कामी येईल.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. गृहिणींना घरातील थोरामोठ्यांची मने जपावी लागतील.

कन्या ( शुभ रंग- मरून)
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज यश नक्कीच मिळेल. तरुण वर्गाने मौज मजा करताना कायद्याचे उल्लंघन करू नये.

तूळ ( शुभ रंग- सोनेरी)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. कुसंगतीमुळे प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्ही जोडीदारास दिलेले शब्द पाळाल.

धनु- (शुभ रंग- निळा)
ध्येयप्राप्ती साठी कामाचे तास वाढवावे लागतील. काही येणी असतील तर ती मागायला लाजू नका. रुग्णांनी पथ्य पाणी पाळावे. गृहिणीसाठी आज अतिव्यस्त दिवस.

मकर ( शुभ रंग- राखाडी )
नोकरदार वरिष्ठांचे मूड सांभाळतील. कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी)
आनंदी व उत्साही दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. आज घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

मीन -(शुभ रंग – जांभळा )
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क *9689165424*

ग्लोबल न्युज नेटवर्क: