स्वतःचे पाप जाळण्याचा प्रयत्न, हाथरसप्रकरणी संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

स्वतःचे पाप जाळण्याचा प्रयत्न, हाथरसप्रकरणी संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

हाथरस येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून तिचा मृतदेह संशयास्पद रात्रीच्या अंधारात जाळण्यात आला. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. स्वतःचे पाप जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे असे आरोप संजय राऊत यांनी लागले होते.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हिंदुत्वाच्या राज्यात हा प्रकार घडतो आणि रामराज्य म्हणवल जाते. पण ही दुर्देवी घटना पाहता सितामाई सुद्धा आक्रोश करत असेल असे म्हणत त्यांनी योगी सरकारला धारेवर धरले. तिच्यावर विधी नुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत. पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये मीडियाच्या स्वातंत्र्यावर गँग रेप केला जातोय असे ते पुढे म्हणाले आहेत.

पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’कडे चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीला टोला

पिडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना यूपी पोलिसांनी अडवलं त्यांना धक्काबुक्की केली त्यात टे खाली पडले यावरून त्यांनी संताप व्यक्त करत, पीडित कुटुंबाला स्थानिक प्रशासनाच्या मदतीने धमक्या दिल्या जात आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

ग्लोबल न्युज नेटवर्क: