‘मी केलं ते तू देखील करू शकतोस,’ सचिन तेंडुलकरनं पाठवलं जळगावच्या चिमुकल्या मुलीला पत्र

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता 9 वर्ष उलटली आहेत. त्यानंतरही त्याची जादू कायम आहे. आजही सचिनला भेटण्याची, त्याला किमान एकदा प्रत्यक्ष पाहण्याची, त्याच्याकडून यशाचा कानमंत्र घेण्याची अनेकांची इच्छा असते. काही सुदैवी व्यक्तींची ही इच्छा पूर्ण होते.

जळगावचा 7 वर्षांचा चिमुकला अनय डोहाळे हा त्यापैकी एक आहे. पहिलीत शिकणाऱ्या अनयला थेट सचिन तेंडुलकरनं पत्र लिहून यशाचा कानमंत्र दिला आहे. सचिनचं पत्र का पाठवलं? सचिननं अनयला पत्र पाठवण्याचं कारण हे देखील खास आहे. प्रत्येक फॅनबद्दल सचिनला वाचणारं प्रेम यामधून स्पष्ट होते. जळगावचा डोहाळे परिवार चार महिन्यांपूर्वी मुंबई फिरायला आला होता. मुंबई दर्शनामध्ये गाईडने त्यांना सचिनचे घर बाहेरून दाखवले.

सचिनचं घर पाहाताच या क्रिकेटच्या देवाला भेटण्याचा हट्ट अनयनं आई-वडिलांकडं केलं. त्यावर, ‘सचिनला असं भेटता येत नाही, आपण घरी जाऊन त्याला पत्र लिहू असं सांगत त्याच्या आई-वडिलांनी वेळ मारून नेली. डोहाळे परिवार जळगावला परतला. अनय आई-वडिलांनी सांगितलेली गोष्ट विसरला नव्हता.

सचिनला पत्र लिहिण्यावर तो ठाम होता. अखेर त्यानं आई-वडिलांच्या मदतीनं सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं. डोहाळे कुटुंबासाठी हा विषय इथंच संपला होता. पण, पत्र लिहिल्यानंतर चार महिन्यांनी सचिननं त्यांच्या पत्राला उत्तर पाठवलं आहे.

मी हा अनुभव घेतला आहे. तू देखील तशी वाटचाल कर’ असा कानमंत्र सचिननं अनयला दिला आहे. सचिननं स्वहस्ताक्षरात पत्र पाठवून त्याचे छायाचित्र व स्वाक्षरी पाठवावी अशी विनंती अनयनं केली होती. सचिननं अनयचा तो बालहट्ट देखील पूर्ण केला आहे.

Team Global News Marathi: