राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होणार, निवडणूक आयोगाची महत्वपूर्ण पत्रकार परिषद

 

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.या पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मतांसाठी देशातील सर्व राज्यांचा दौरा करू शकतात. खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता.राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निकष आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35हून अधिक असावे.

तसेच त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत. एका उमेदवाराला अधिकाधिक चार नामांकने दाखल करता येतात.

 

Team Global News Marathi: