‘मातोश्री अन् डायरी’ त्या संदर्भात संजय राऊतांचं थेट विरोधकांना प्रतिउत्तर !

 

मुंबई | शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाला सापडलेल्या डायरीतील काही गोष्टींमुळं वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या डायरीत ‘मातोश्री’ला 2 कोटी आणि 50 लाखांचं घड्याळ दिलं असल्याचा उल्लेख आहे. याबाबत आज बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत म्हणाले की, ‘मातोश्री’ला म्हणजे आईला असू शकत शकत नाही का?. महाराष्ट्रामध्ये दानधर्म करण्याची एक परंपरा आहे, मी त्यांचे वक्तव्य पाहिलं. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही. डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे, खोटे गुन्हे दाखल करतात. अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात हे सीबीआयने भाजप नेत्यांची नावं आली तेव्हा सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असं राऊत म्हणाले.

जोवर उद्योग वाढत नाहीत सार्वजनिक उपक्रमांना ताकत मिळणार नाही तोवर रोजगार वाढणार नाही. आतापर्यंत लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार हा सरकारी उद्योगांनी दिला आहे. मात्र भाजप सरकारनं दोन पाच आपल्या मर्जीतील उद्योजकांच्या हाती देश दिला आहे. यामुळं काही मोजक्या लोकांची संपत्ती वाढणार आहे आणि पर्यायानं भाजपची संपत्ती वाढेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: