सीबीआय’ला राज्यानं नाकारलेल्या परवानगीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

 

पंजाब, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह नऊ राज्यांनी आपल्या सीबीआय तपासास राज्यात परवानगी नाकारल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. सीबीआयला राज्यानं नाकारलेल्या परवानगीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेडमध्ये असून पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात घोटाळा झाला तर राज्य पोलीस लक्षं घालते.

अजित पवार म्हणाले की, ज्यांना उद्योग नाही, ते टीका करतात, महाराष्ट्रात घोटाळा झाला तर राज्य पोलीस लक्षं घालते. कोणत्याही बॅंकेत घोटाळा झाला तर आरबीआय लक्ष घालते. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान ही टीका गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेडमध्ये आहेत. भरणे येथे जिल्हा प्रशासकीय आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदी अधिकारी देखील हजर आहेत. असं असताना खेड दापोलीचे शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम या बैठकीला गैरहजर आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Team Global News Marathi: