पवारांच्या राजीनाम्यानंतर सिल्वर ओकवरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शरद पवार यांच्या या निर्णयाचा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तर या निर्याणानंतर अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवार याच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, काल दिवसभर राजीनामा मागे घेण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांची आंदोलनं सुरू होती.

आज देखील दिवसभर आंदोलनाची शक्यता आहे. सिल्वर ओकवर सुरक्षा वाढवली आज दिवसभर होणाऱ्या आंदोलनाची शक्यता लक्षात घेता, शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांच्या बैठका होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नवा अध्यक्ष कोण ? यावर सुद्धा चर्चा होताना दिसून येत आहे

मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्ककाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिली आहेत, आता आणखी नवी जबाबदारी नको म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्याणानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना अश्रू अनावर झले होते तर अनेकांसाठी हा धक्का मानला जात आहे.

Team Global News Marathi: