नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, प्रकरण पोहचले सुप्रीम कोर्टात

 

मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सव्हिसेना पक्षात आणि राणे कुटुंबियांमध्ये वाद होत असल्याचे चित्र दिसून आले होते. मुंबई महापालिकेने मंत्री नारायण राणे यांना बंगल्याबाबत नोटीस पाठवली पण हायकोर्टाने दिलासा दिल्यामुळे ती मागे घेतली. आता या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील अधीश बंगल्याबाबत वाद अजूनही मिटलेला नाही. जुहू येथील अधिश बंगला पुर्णपणे पाडण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई महारापालिकेने बजावलेली नोटीस मागे घेतल्याने नारायण राणेंना दिलासा मिळाला होता. पण आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे.

आता राणे विरोधातील या तक्रारीचे रूपांतर जनहीत याचिकेत झाले असून पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत निरव मोदींच्या बंगल्याप्रमाणे नारायण राणेंचा अधीश बंगला पाडावा अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहण्याचे ठरणार आहे.

Team Global News Marathi: