‘हलाल’ जेवण म्हणजे आर्थिक जिहाद; भाजपा नेत्याचं विधान

 

हिजाबबाबत उच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध दर्शवत काही मुस्लिमांनी राज्यभर बंदची हाक दिली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध केल्याने येथील हिंदूंनी त्यांच्यावर काही निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी ‘हलाल’ अन्नाचे वर्णन ‘आर्थिक जिहाद’ असे केले आहे.

उच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध केल्याने येथील हिंदूंनी त्यांच्यावर काही निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकातील कापू मारी जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यापार करू देण्यास विरोध केला. तर, शिमोगा शहरातील प्रसिद्ध मेरीकांबा जत्राही मुस्लिम व्यापाऱ्यांसाठी रोखण्यात आली. येथील अनेक जत्रे, उत्सव आणि मंदिरांसमोर व्यापार करण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी ‘हलाल’ अन्नाचे वर्णन ‘आर्थिक जिहाद’ असे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून काही उजव्या विचारसरणीचे गट हिंदूंना ‘हलाल’ मांस न वापरण्याचे आवाहन करत आहेत. यागोदर काही काळापूर्वी, कर्नाटकातील काही भागांमध्ये हिंदू धार्मिक मेळ्यांदरम्यान मुस्लिमांना मंदिरांभोवती दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली होती.

सीटी रवी म्हणतात, हलाल हा आर्थिक जिहाद आहे. याचा अर्थ मुस्लिमांनी इतरांशी व्यापार करू नये म्हणून जिहादसारखा वापर केला जातो. त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जेव्हा त्यांना असे वाटते की हलाल मांस वापरले पाहिजे, तेव्हा ते वापरू नये असे म्हणण्यात गैर काय आहे?” असही ते म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: