राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार – रविवार  10 .07 .2022  (Today’s Horoscope 10 July 2022 )       

शुभाशुभ विचार – 14 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – शयनी एकादशी.

राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – 09.55 पर्यंत विशाखा नंतर अनुराधा.

चंद्र राशी –   वृश्चिक.

________

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग – लाल )

आज कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की लाभेल. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच  करा.

वृषभ ( शुभ रंग – पिस्ता)

आज कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज पत्नीला दिलेली वचने पाळाल.

मिथुन- ( शुभ रंग- क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळे ही दूर झाल्याचे जाणवेल. तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. गृहिणींना थकवा जाणवेल.

कर्क – ( शुभ रंग -चंदेरी)

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही जणांचा आज गूढ शास्त्राकडे कल वाढेल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.

सिंह (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

काही मनाजोगत्या घटनांनी तुमचे मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. इतरांना आज मदत करू शकाल. सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने गृहिणी भारावतील.

कन्या ( शुभ रंग – हिरवा)

आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात कुणाला शब्द दिले असतील तर ते पाळावे लागतील. आज जरा मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस करा.

तूळ ( शुभ रंग- जांभळा)

आर्थिक स्थिती आज उत्तम असून तुमचे मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आज संध्याकाळी सहकुटुंब चैन करणार आहात. अति सडेतोड बोलणे टाळा,  त्यामुळे नाती दुरावतील.

वृश्चिक- ( शुभ रंग- मरून) 

आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मान पान मिळेल. आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.

धनु (शुभ रंग- भगवा)

जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल. प्रवास होतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मकर- ( शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहिल. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

कुंभ- (शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. अधिकारांचा योग्य वापर करण्याची वेळ येणार आहे. भिडस्तपणा नको.

मीन – ( शुभ रंग – मोतीया)

कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. वादविवादात आज तटस्थ रहा. थोडे अध्यात्माकडे वळणे हिताचे राहील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार).

ग्लोबल न्युज नेटवर्क: