आजचे पंचांग – वार – रविवार 10 .07 .2022 (Today’s Horoscope 10 July 2022 )
शुभाशुभ विचार – 14 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – शयनी एकादशी.
राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – 09.55 पर्यंत विशाखा नंतर अनुराधा.
चंद्र राशी – वृश्चिक.
________
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – लाल )
आज कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की लाभेल. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच करा.
वृषभ ( शुभ रंग – पिस्ता)
आज कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज पत्नीला दिलेली वचने पाळाल.
मिथुन- ( शुभ रंग- क्रीम)
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळे ही दूर झाल्याचे जाणवेल. तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. गृहिणींना थकवा जाणवेल.
कर्क – ( शुभ रंग -चंदेरी)
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही जणांचा आज गूढ शास्त्राकडे कल वाढेल. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.
सिंह (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
काही मनाजोगत्या घटनांनी तुमचे मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. इतरांना आज मदत करू शकाल. सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने गृहिणी भारावतील.
कन्या ( शुभ रंग – हिरवा)
आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात कुणाला शब्द दिले असतील तर ते पाळावे लागतील. आज जरा मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस करा.
तूळ ( शुभ रंग- जांभळा)
आर्थिक स्थिती आज उत्तम असून तुमचे मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आज संध्याकाळी सहकुटुंब चैन करणार आहात. अति सडेतोड बोलणे टाळा, त्यामुळे नाती दुरावतील.
वृश्चिक- ( शुभ रंग- मरून)
आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मान पान मिळेल. आज तुमचे मन काहीसे चंचल असेल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.
धनु (शुभ रंग- भगवा)
जमाखर्चाची तोंड मिळवणी करणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल. प्रवास होतील. प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
मकर- ( शुभ रंग – निळा)
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहिल. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.
कुंभ- (शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. अधिकारांचा योग्य वापर करण्याची वेळ येणार आहे. भिडस्तपणा नको.
मीन – ( शुभ रंग – मोतीया)
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. वादविवादात आज तटस्थ रहा. थोडे अध्यात्माकडे वळणे हिताचे राहील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार).