बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?

 

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 आमादार फोडले. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यापूर्वी शिवसेनेने काही गणिते करुन शिंदे गटाच्या मोजून 16 आमदारांवर पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई केली होती. शिंदे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले होते.

न्यायालयाने या आमदारांना दिलासा देत निकाल 11 जुलै म्हणजे आजवर राखून ठेवला होता. परंतु या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. कारण, शिवसेनेचे वकील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी आज सरन्यायाधीश एन. व्हि. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य़ीय खंडपीठासमोर विनंती करणार असल्याची माहिती मिळते आहे.

घटनेतील 10 व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार बंडखोरी केल्यानंतर जर दोन तृतीअंश सदस्य दुसऱ्या पक्षात सामिल झाले नाहीत तर, त्यांच्या पाठींब्यावर असलेले सरकार घटनाबाह्य ठरविण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने केली होती. या याचिकांवर न्यायमुर्ती सूर्यकांत आणि न्यायमुर्ती जे. बी. पारडीवाल यांच्या खंडपीठाने 11 जुलै रोजी सुनावणी ठेवली होती. तसेच हा खटला शिवसेनेचे भविष्य ठरवणारा आहे. ह्या निकालात जर न्यायालायाने 16 आमदारांवरची कारवाई पात्र ठरवली तर शिंदे सरकार अडचणीत येऊ शकते.

Team Global News Marathi: