घरासाठी ५० लाख भरायचे कसे? बीडीडीतील पोलिस कुटुंबीयानी व्यक्त केला संतप्त

 

मुंबईतील बीडीडी चाळींच्य पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र याबाबत ठकरे सरकारने आता निर्णय घेतला असून, पोलिसांना हे घर ५० लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल अशी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा केली आहे. मात्र हा निर्णय संतप्त करणारा आहे अशी पोलीस आणि कुटुंबियांची भावना आहे.

बीडीडी पोलिस वसाहतीत राहणाऱ्या उत्कर्षा उत्कर्ष सावंत. पती ८ महिन्यापूर्वी आजारी असल्यामुळे मृत्यू पावले. बीडीडी पोलीस चाळ क्रमांक २६ मधील रहिवासी. घरी २ मुली, सासू आणि त्या स्वतः. पती उत्कर्ष उदय सावंत हे पोलीस खात्यात शिपाई होते. २९ वर्ष त्यांनी सेवा केली. सावंत कुटुंबीयांच्या तीन पिढ्या या वरळीतील या बीडीडी चाळीत वास्तव्यास आहेत. उत्कर्ष सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घरातील कर्ताधर्ता पुरुष गेल्याने जगायचं कसं खायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. जेमतेम काही काम करून उत्कर्षा सावंत या आपल्या कुटुंबाचा उपचार करत उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे आम्ही जगायचं कसं खायचं कसं याच प्रश्न आम्हाला आहे. त्यात सरकारने सांगितलेले इतक्या रकमेचे घर आम्ही नाही घेऊ शकत, असे उत्कर्षा सावंत सांगतात. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या घराचा प्रश्न सावंत कुटुंबीयांचे समोर कायम उभा आहे. घरच्या कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर अद्याप पेन्शन ही सुरू झालेली नाही, असं सावंत आजी सांगतात.

Team Global News Marathi: