पंतप्रधान मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही, दिपाली सय्यद यांनी लगावला राज ठाकरेंना टोला

 

मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला. भोंगा आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे, असे स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिले. स्वारगेटच्या गणेश कला, क्रीडा मंच येथील सभेत राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावरही राज ठाकरेंनी निशाणा साधला. जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं. ते तिथून झालं, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. केसेस घेऊन पक्ष वाढत नाही. दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनतां येणार नाही. मेळावे घेऊन महागाईवर बोलता येत नाही. मोदींचे कौतुक करून काय भेटणार, बृजभूषण काय तुमच्यासारखे भुमिका बदलत नाही, असा निशाणाही दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर साधला आहे. आता या टीकेला मनसे काय प्रतिउत्तर देते हे पहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: