“भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचाही गळा घोटला”; संजय राऊतांची टीका

 

मुंबई | धार्मिक स्थळावरील भोंग्यांवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा संस्थाननेही महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरात पहाटे होणारी काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीच्यावेळी मंदिरावरील स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पाश्वर्भूमीवरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत ट्विटमध्ये म्हणाले, “भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचासुध्दा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.” असे म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी काकड आरती आणि शेजारतीच्यावेळी स्पीकर बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी सांगितले. साई मंदिरासह सर्वच धार्मिक स्थळांनी पहाटे आणि रात्री ध्वनिवर्धक न लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Team Global News Marathi: