पुरग्रस्तांच्या मदतीसाठी युवासेना सरसावली, मदत सामग्री घेऊन अनेक सेवारथ रवाना !

 

मुंबई |  कोकणासह पश्चिम महाराष्ट्र पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. कोकणात पुराच्या पाण्यामुळे अनेकांचा संसार वाहून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रणित युवासेना आता मदतीसाठी सरसावली आहे.

कोकणातील संकटात सापडलेल्या लोकांना अन्नधान्यासह इतर गरजेच्या वस्तू मदत म्हणून देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेने पुढाकार घेतला आहे. शनिवारी मुंबईहून आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे सेवारथ मदत सामग्री घेऊन पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले.

पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी युवासेनेतर्फे शनिवारी ब्लॅंकेट, अन्नधान्य, पिण्याचे पाणी अशी मदत सामुग्री रवाना करण्यात आली. यावेळी युवासेना अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात इतर ठिकाणीही मदत करण्यास आम्ही तत्पर असल्याचे आश्वासनही दिले.

Team Global News Marathi: