शिल्पा शेट्टीला १२० टक्के माहित असणार…! शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांचा आरोप !

 

मुकेश खन्ना यांनी शिल्प शेट्टी हीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर बोलताना मुकेश खन्ना यांनी शल्प शेट्टी हिच्या वक्तव्यावर मोठे विधान केले आहे. नव-याचे कारनामे बायकोला माहित नाही, हे शक्यचं नाही. शिल्पा शेट्टीला 120 टक्के माहिती असणार, असा दावा त्यांनी केला आहे.

एका वृत्तसमूजला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना राज कुंद्रा प्रकरणावर बोलले. राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही सहभाग असू शकतो का? फक्त राज कुंद्राची पत्नी असल्यामुळं शिल्पाला टार्गेट केलं जातं आहे, हे योग्य आहे का? असं मुकेश खन्ना यांना विचारण्यात आले होते.

यावर मुकेश खन्ना म्हणाले, ‘मी राज कुंद्राला कधीही भेटलेलो नाही. पण या प्रकरणावर इंडस्ट्रीतलं कोणीही बोलायला तयार नाही. इंडस्ट्री सोडा राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिनंही का बोलू नये? पतीच्या कारनाम्याबद्दल माहिती असणारी ती पहिली व्यक्ती असणार. ती का बोलत नाहीये? पती काय करतो, हे तिला माहिती नसणार, हे शक्य नाही. आज कोणीही सती-सावित्री नाही, जी पडद्यात बसते. शिल्पा व राज कुंद्रात कसं नातं होतं, यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. पण शिल्पाला 120 टक्के माहित असणार असे विधान खन्ना यांनी केले आहे.

Team Global News Marathi: