“तुम्ही ‘गरबा’ कराल, तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल”

 

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (मुंबई) व्यवस्थापन अदानी समूहाच्या ताब्यात आले आहे. स्वतः गौतम अदानी यांनी याबाबत ट्विटकडू काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. केंद्र सरकार व सिडकोची मान्यता मिळाल्यानंतर मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीकेकडून अदानी एअरपोर्ट होल्डिंगकडे देण्याचा मार्ग मोकळा झाला.

या निर्णयामुळे लवकरच नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीचे कामही अदानी ग्रुपला हस्तांतरीत होणार असल्याने अदानी एअरपोर्ट होल्डिंग ही विमानतळांचे व्यवस्थापन पाहणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे.
नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय …विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल…” से ट्विट सरदेसाई यांनी केले आहे. काही दिवसांपासून एरपोर्टचे मुख्य कार्यालय आमदाबादला हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मनसेने हा इशारा दिला आहे.

 

Team Global News Marathi: