‘मी पाच वेळा माझा मोबाईल बदलला परंतु, प्रशांत किशोर यांचा धक्कादायक खुलासा !

 

इस्त्राईलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकारांवर पाळत ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा संपूर्ण तपास फाॅरेन्सिकच्या माध्यमातून खुलासा झाल्याचा खळबळजनक दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेने केला होता.

समोर आलेल्या माहितीच्या आधारे या साॅफ्टवेअरद्वारे भारतातील एकूण ३०० च्यावर अधिक लोकांवर नजर ठेवण्यात येत असल्याचा खुलासा या वृत्तामध्ये करण्यात आला होता.या प्रकरणाच्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर खुद्द केंद्राला या प्रकरणी उत्तर द्यावं लागलं होतं.

या प्रकरणात आता प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देखील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. ‘मी पाच वेळा माझा मोबाईल बदलला, परंतु हॅकींग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. १४ जुलै रोजी प्रशांत किशोर यांच्या फोनशी छेडछानी केल्याचा रिपोर्ट मीडिया संस्थांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इस्त्राईलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून जगभरातील १४०० लोकांवर पाळत ठेवण्यात येत असल्याचा खुलासा करण्यात आला होता. तर भारतात ३०० हून अधिक नागरिक आणि काही पत्रकारांवर नजर ठेवण्यात येत असल्याचं देखील अहवालात म्हटलं आहे.

Team Global News Marathi: