तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही – निलेश राणे

 

सोलापूर | भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर रात्री ८ च्या सुमारास काही काही अज्ञात व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पाडळकरणाच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यावर आता भाजपा नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीवर हल्लबोल केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, असा गर्भित इशारा देत तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, अशी धमकीच निलेश राणेंनी दिली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झाला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधिताने तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटारसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली. मात्र या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Team Global News Marathi: