तू बॉलिवूड अभिनेत्रींना कपड्यावरून ज्ञान देते आणि… कंगनाला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले |

 

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते तसेच अनेकांवर टीका करताना सुद्धा अनेकवेळा दिसून येते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. मात्र आता कंगनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यात आलं आहे.

कंगनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगनाच्या पाठी सूर्यास्त होताना दिसत आहे. कंगना समुद्र किनाऱ्याजवळ आहे. तर कंगनाने या फोटोत पांढऱ्या रंगाचे ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाची पँट परिधान केली आहे. कंगनाने गळ्यात गोल्डन चेन परिधान केली आहे. कंगना या फोटोंमध्ये सुंदर दिसत आहे. मात्र या फोटोमुळे कंगना आता ट्रोल होऊ लागली आहे.

आता तिच्या या बोल्ड फोटोवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांचे म्हणने आहे की इतर सेलिब्रिटींना त्यांच्या कपड्यांवरून सल्ला देते आणि स्वत: ब्रालेटमध्ये फोटो शेअर करते. तर एक नेटकरी म्हणाला, ‘तू एवढा घाणेरडा ड्रेस परिधान करशील अशी अपेक्षा नव्हती कंगना.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू स्वतः इतरांच्या पोस्टवर कमेंट करते, असा फोटो शेअर करताना तू विचार केला नाहीस का? असा सल्ला कंगनाला दिला आहे.

Team Global News Marathi: