केंद्रीय राज्यमंत्री कराड यांच्या ‘आशीर्वाद’ यात्रेत पंकजा मुंडे सहभागी होणार?

 

बीड | काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यामध्ये पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न दिल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. पण पंकजा मुंडे यांनी स्वतः या प्रकरणावर स्पष्टीकरण देऊन वाद मिटवला होता

आता त्या पाठोपाठ केंद्रीय मंत्रिमंडळात नव्यानं समावेश झालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार आशीर्वाद यात्रा काढावी लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हेही जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. ही यात्रा कराड यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.

यात्रेची सुरुवात करण्यापूर्वी कराड हे पंकजा मुंडे यांच्या घरी जाणार आहेत. त्यानंतर गोपीनाथगडावरून या आशीर्वाद यात्रेला प्रारंभ होणार असल्याची माहिती कराड यांनी स्वतः दिली आहे. दुसरीकडे, नारायण राणे, डॉ. भारती पवार आणि कपिल पाटील यांचीही आशीर्वाद यात्रा निघणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यात बंद दाराआड चर्चा खरंतर, कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं महाराष्ट्रातील राजकारण तापलं होतं. कराड यांच्या निवडीनं पंकजा मुंडे नाराज असल्याचं चित्र होतं. मात्र पंकजा यांनीच या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकला होता. यानंतर आता कराड यांची जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे.

Team Global News Marathi: