येत्या पंधरा दिवसात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार

 

राज्यात वाढत्या दुचाकी दुर्घटनेला आळा घालण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात याला असून यापुढे बाईकवरून प्रवास करीत असताना हेल्मेट वापरणं आता मुंबईतही बंधनकारक करण्यात येणार आहे. मुंबईत आता दुचाकीवरून प्रवास करताना मागे बसणाऱ्या पिलियन रायडरलाही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आहे. मोटरसायकवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट वापरणं बंधनकारक होणार आहे.

या नव्या नियमाबाबत वाहतूक पोलिसांचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. हेल्मेट न वापरल्यास 500 रुपये दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित करण्याची तरतूद या नव्या नियमांतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता कुठेही जाताना बाईक चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. येत्या पंधरा दिवसात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार अशी माहिती मिळाली आहे. मोटार सायकल चालवताना हेल्मेट न वापरल्यास पाचशे रूपये दंड आणि तीन महिन्यासाठी गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येईल.

तसेच बाईक चालकासह मागे बसणाऱ्याला हेल्मेट बंधनकारक असेल. त्यामुळे मुंबईकरांना पंधरा दिवसांनी घराबाहेर पडताना हेल्मेट घालावे लागणार आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एक आदेश काढला आहे. मुंबईत जे दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत. म्हणजेच चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारण असणार आहे.

Team Global News Marathi: