काँग्रेसचा ‘हात’ सोडून कपिल सिब्बल समाजवादी पक्षाच्या तिकिटावर जाणार राज्यसभेवर

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला काँग्रेस रामराम केला आहे. काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी गुपचूप काँग्रेस पक्ष सोडला. काँग्रेसमधून बाहेर पडत कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाची वाट धरली आहे. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने कपिल सिब्बल राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षाचं सदस्यत्व घेतलेलं नाहीये. मात्र, सपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत दाखल होतील.

काही व्दिसांपूर्वी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी कपिल सिब्बल यांची जोरदार प्रशंसा केली होती. तेव्हापासून कपिल सिब्बल यांना समाजवादी पक्ष राज्यसभेची उमेदवारी देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. १६ मे रोजी काँग्रेसचा राजीनामा कपिल सिब्बल यांनी आज लखनऊ येथून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांनी सांगितले की, १६ मे रोजी मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

त्यांनी सांगितले की, अपक्ष म्हणून ते पुन्हा एकदा समाजवादी पक्षाच्या मदतीने उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर जात आहेत. मात्र कपिल सिब्बल यांनी औपचारिकरित्या समाजवादी पक्षात प्रवेश केलेला नाहीये. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. सपाच्या पाठिंब्याने ते राज्यसभेवर जात आहेत. फॉर्म भरल्यानंतर सिब्बल म्हणाले की, आम्हाला विरोधी आघाडी करायची आहे. उदयपूर चिंतन शिबिराचे निमंत्रण काँग्रेस पक्षाचे नुकतेच राजस्थानमधील उदयपूर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चिंतन शिबिराचे निमंत्रण ही कपिल सिब्बल यांना देण्यात आले होते. मात्र या चिंतन शिबिराला ते गेलेच नाहीत.

Team Global News Marathi: