यशवंत जाधव, महाडेश्वरांना धक्का, दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज ही प्रक्रिया पार पडत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करुन, नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले.

आज एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता 236 पैकी 219 प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. 63 पैकी 53 प्रभागात गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार 53 वॉर्ड ओबीसी आरक्षितच होतील.

राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड क्र 130 ओबीसी आरक्षित. आधी हा वॉर्ड ओपन होता. राखी जाधवांना बाजूचे वॉर्ड धुंडाळावे लागणार मुंबई महापालिका निवडणुकीकरता आरक्षण सोडतीत शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांना फटका, तृष्णा विश्वासराव यांचा वॉर्ड 185 ओबीसी महिला आरक्षित, हा वॉर्ड आधी ओपन होता, तृष्णा विश्वासराव यांना बाजूचे वॉर्ड शोधावे लागणार

शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही आरक्षण सोडतीत धक्का, यशवंत जाधव यांचा वॉर्ड 217 ओबीसी महिला आरक्षितशिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्र. 96 ओबीसी महिला आरक्षित, परंतु विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर यांना या वॉर्डमधून उमेदवारी मिळू शकेल

Team Global News Marathi: