‘तुमच्यावर लोकं पाळत ठेवून’ नवनीत राणांना धोक्याची सूचना देणारे पत्र;

 

अमरावती | खासदार नवनीत राणांना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे मात्र यावेळी त्या आपापल्या विधानामुळे नाःई तर त्यांना देण्यात आलेल्या सावधगिरीचा इशार्यामुळे चर्चेत आल्या आहे. राणा यांना एक सावधगिरीचा इशारा देणारं पत्र समोर आलं आहे. नवनीत राणा यांना धोका असल्याची पत्रातून सूचना करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यानं पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

पत्रावरुन असं स्पष्ट होत आहे की, मुस्लिम समाजाच्या एक शासकीय कर्मचारी असलेल्या व्यक्तीने आहे. त्या पत्रात, राजस्थान बोर्डरवरून काही संशयित इसम हे अमरावतीमध्ये आले असून ते आपल्यावर पाळत ठेऊन आहेत. ते आपल्या घरी सुद्धा येऊन गेले आहेत, अशी माहिती या पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांना या व्यक्तीने दिली आहे.

पत्रात पुढं म्हटलं आहे की, आपण माझी बदली करून दिली होती आणि कोरोना काळात माझ्या वडिलांची देखील खूप मदत केली होती. आपल्या सोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी मी प्रार्थना करतो. आपण पुढे खूप मोठ्या पदावर जावे अशा शुभेच्छा देखील या पत्रातून देण्यात आल्या आहेत. हे पत्र एका लिफाफ्यात आज सकाळी नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या शंकर नगर येथील गंगासावित्री निवासस्थानी कुणीतरी अज्ञात व्यक्ती टाकून गेल्याची माहिती आहे.

यशवंत जाधव, महाडेश्वरांना धक्का, दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल – रामदास आठवले

Team Global News Marathi: