‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन राज्यपालांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा गौरव

 

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आलं आहे. या संदर्भातील माहिती विशाखा राऊत हिने आपल्या सोशल मीडियाच्या मध्यातून आपल्या चाहत्यांना दिली आहे.

विशाखाने आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, ‘प्रचंड आनंद झाला. आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. आईच्या डोळ्यातला आनंद, दादा वाहिनीच्या डोळ्यामधलं प्रेम, आणि पोराने म्हटलेलं एक वाक्य.. ‘आई एकदम तुला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेताना पहिलं आणि भरून आलं’.. सगळ्यांचे कौतुकाचे फोन मित्र मैत्रिणीचे फोन..शुभेच्छा वर्षाव.. खूप खूप शब्दात न सांगता येणारा न मावणारा आनंद झालाय.. ‘ असे विशाखा म्हंटली आहे.

पुढे पोस्टमध्ये ती म्हंटली की, ‘मंडळी हे प्रेम आहे तुम्हा सर्वांच, ज्यामुळे मी माझं काम जबाबदारीने पार पाडण्याचा कायम प्रयत्न करत असते. असंच प्रेम कलाकारावर राहू द्या आणि सूर्यदत्तचे संस्थापक ह्यांचे देखील आभार आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या देवाचे आभार.’ अशी पोस्ट शेअर करुन विशाखानं आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच विशाखासोबत इतर ११ महिलांना सुद्धा पुरसखाने गौरवण्यात आले आहे.

Team Global News Marathi: