देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

देवपूजा का आणि कशी करावी ; तुम्हाला माहिती नाही ना ? तर मग जाणून घ्या देवपूजे मागील शास्त्र

देवाची जी पूजा केली जाते, त्यात देवाला खूष करणे हा उद्देश असला तरी गंध, अक्षता, फुले, धूप, दीप, उदबत्ती यांनी पूजा करण्यामागे शास्त्र आहे. माणसाप्रमाणे देवांचा स्वभाव नसल्याने देवाला खूष करण्याचा प्रश्नच येत नाही. भक्तिमार्गातील सर्व साधनपद्धती भक्तांचा देवाबद्दल भाव निर्माण करतात. शास्त्रोक्त पूजा केल्याने आपली भाववृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते. आपण नित्य पूजेत वापरणारे घटक, पूजेच्यादृष्टीने त्यांचे महत्त्व, आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

स्नान—–

सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसून घेतो. त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते. आपण पूजत असलेल्या देवतांच्या मूर्तीत पवित्र लहरी याव्यात, मूर्तीवर चढलेली रजतमांची अपवित्र लहरीची पूट काढून टाकण्यासाठी. देवांना नित्य स्नान घालणे आवश्यक आहे.

गंध ( चंदन)—–

सर्व देवता गंधानुगामी असतात, म्हणजे गंधाकडे आकर्षित होतात. देवांनी आपल्या पूजेतील मूर्तीत आकर्षित होऊन रहावे, यासाठी देवांना चंदन लावतात.

अक्षता—–

न तुटलेले तांदूळ म्हणजे अक्षता. देवांना अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ती त्या अक्षतांकडे आकर्षित होते. वाहिलेल्या अक्षतांमध्ये त्या देवांची कंपने निर्माण होतात. गणेशमूर्ती, कलश, अथवा कोणत्याही देवतेची मूर्ती ठेवताना मूर्तीखाली तांदूळ ठेवतात. त्या तांदळात देवांची कंपनशक्ती येते. हे तांदूळ नंतर रोजच्या तांदळात एकत्र करून भात खाल्ल्यास ती शक्ती आपल्यालाही मिळते.

फुले——

विशिष्ठ रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात. उदा. …. गणपती लाल रंगाकडे, शंकर पांढऱ्या रंगाकडे, विष्णू पिवळा रंगाकडे इत्यादी.. कोमेजलेल्या फुलांचा रंग बदलतो, म्हणून कोमेजलेली फुले देवाला वाहू नये.

हळदकुंकू—–

कुंकू हळदीपासून तयार करतात. हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते म्हणून. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदीत भूमी लहरी जास्त असतात. असे पृथ्वीतत्त्व असलेली हळद व कुंकू वाहिल्याने मूर्तीतील दैवीलहरी जोरात प्रक्षेपित होतात. पृथ्वीवरील अनिष्ट शक्तींचा त्रास होत नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया ठसठसशीत कुंकू लावत. पुरूषही टिळा लावूनच बाहेर पडत.

धूप—–

धूप हे सुवासिक, वायूरूप आहे. या सुगंधामुळे देवता पूजास्थळी आकर्षित होतात. धूपाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून सकाळ, संध्याकाळ धूप व उदबत्तीने पूजन करावे.

दीप—–

खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते. आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही. म्हणून संकेतरूपाने निरांजनात गाईच्या तुपात वात पेटवून देवांना ओवाळतात. तुपाच्या दिव्यातून निघणाऱ्या लहरी सूक्ष्म असल्याने त्या अतिसूक्ष्म अशा देवतांच्या लहरी आकृष्ट करू शकतात. म्हणून वाढदिवसाला निरांजनाने ओवाळणे, महत्त्वाचे आहे.

आरती—–

आरती करताना घंटा व इतर वाद्ये वाजवतात. त्यामुळे मूर्तीत आलेली देवतांची शक्ती बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते. वाद्ये तालात वाजवावी. आरती सुरात म्हणावी. बेसुर वाद्ये वाजवणे व बेसुर आरती करणे म्हणजे वातावरणातील अनिष्ट शक्ती आकृष्ट करणे होय.

नमस्कार—–

नमस्कार करताना हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात. त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते. या मुद्रेमुळे आपण देवतांकडून येणाऱ्या शक्तीलहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो.

नैवेद्य (प्रसाद)—–

प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो. त्या त्या देवतांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखविल्याने त्या देवतांच्या शक्तीलहरी नैवेद्यातील प्रसादात येतात. असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही ती शक्ति मिळते. फार फार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी देवासंदर्भात, प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे. फक्त स्वधर्माचा अभ्यास कमी असल्याने काही बुद्धीवादी त्यास अंधश्रद्धा म्हणतात. शेवटी कृती भावपूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही.

प्रदक्षिणा—–

प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्टबाजूने येणाऱ्या लहरी आपण ग्रहण करू शकतो.

शुभम् भवतु……
श्री. विजय पंडित.

ग्लोबल न्युज नेटवर्क: