चुकीचं काम केलं तसे तर शिक्षा ही झालीच पाहिजे, मग त्या जागी उदयनराजे का असेना; पूजा चव्हाण प्रकरणात उदयनराजे भोसले यांचे सूचक वक्तव्य

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आता राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात विरोधकांनी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिलेली आहे.

ते आज मुंबईत पत्रकार माध्यमांशी बोलताना बोलत होते. ते म्हणाले की, चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा झालीच पाहिजे. मग त्या ठिकाणी उदयनराजेही का असेना, अशी सूचक प्रतिक्रिया देत पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांच्यावर कारवाई करावी या मागणीला समर्थन केले होते.

शनिवारी मुंबईत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंजवर पोहचले होते. यावेळी राज ठाकरे यांच्या सोबत मराठा आरक्षण तसेच राज्यातील विविध प्रश्नावर त्यांनी चर्चा केली होती. तसेच राज ठाकरे यांनी राजमुद्रा सुद्धा त्यांना भेट स्वरूपात दिली होती.

Team Global News Marathi: