महाराष्ट्राला रेमडेसिवीरची अत्यावश्यक गरज असताना गुजरातमध्ये होत आहे मोफत वाटप

 

मुंबई : राज्यात वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसीविर औषधाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यात याच मुद्द्यावरून आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. तसेच रेमडेसिवीर औषधावरून केंद्र सरकारने राजकारण खेळण्यास सुरवात केली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज्यात आज सर्वाधिक कोरोना टेस्ट होत असल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. देशातील अन्य राज्यात कोरोना टेस्ट तितक्या प्रमाणात होत नाहीत त्यामुळे तिथली रुग्णसंख्या कमी दिसून येत आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात ही आमची मागणी आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. पंतप्रधान म्हणतात, महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर कमी पडणार नाही. मग ही औषधे महाराष्ट्राला का कमी पाडली जात आहेत?. लोकांच्या जीवाशी का खेळताय?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

 

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या होत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित असल्यामुळे अधिक आरोग्य सुविधा महाराष्ट्राला मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याचेही राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. पण दुसरीकडे मात्र गुजरातमध्ये रेमडेसिवीरचे मोफत वाटप सुरू आहे. एखाद्या राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते हा गंभीर प्रश्न असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.” असे विधान त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: