… काय सांगता एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात १.०३ लाख कोटींचा फटका

एकेकाळी शेअर बाजारात हर्षद मेहता यांनी घोटाळा करून मोठा धुमाकूळ घातला होता. शेअर बाजाराचा बिग बुल राहिलेल्या हर्षद मेहता याच्या जीवनावर आधारित ही सिरीज होती. या सिरीजमधील सुचेता दलाल यांचं पात्र सर्वांनाच आवडलं होतं. याच प्रसिद्ध अर्थविषयक पत्रकार सुचेता दलाल यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या त्या ट्विटनंतर अदानी ग्रुपचे शेअर्स बाजार उघडताच पडले. त्यामुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात १.०३ लाख कोटींचा फटका बसला आहे.

पत्रकार सुचेता दलाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, काही ग्रुप शेअर बाजारातील शेअरच्या किंमती मॅन्युपुलेट करत आहे. परंतू, त्यांनी कोणत्याही कंपनीचं नाव घेतलं नाही. त्यानंतर राष्ट्रीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून (NSDL) नुकतीच तीन परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली गेली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्वच्या सर्व कंपन्या खाली आल्या.

तसेच सर्व ६ कंपन्यांचे शेअर्स पडले होते. त्यामुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात १.०३ लाख कोटींचं नुकसान झालं. या सर्व प्रकारानंतर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून (NSDL) कोणतंही डीमॅट अकाऊंट फ्रिज करण्यात आलं नसल्याचं सांगण्यात आलं. गेल्या वर्षभरात अदानी ग्रुप भारतातील तिसरा मोठा ग्रुप बनला आहे. त्यांंच्या पुढे टाटा ग्रुप आणि रिलायन्स ग्रुप आहेत.

Team Global News Marathi: