“जनता भारतीय जनता पक्षाला कंटाळली असून काँग्रेस हाच आता एकमेव पक्ष”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी काहीच दिवसांपूर्वी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढणायचा नारा देऊन एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यातच आता पटोले यांनी भाजपला आता काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याचं बोलून दाखवलं आहे. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आता त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा काँग्रेस येणाऱ्या निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

सध्या जनता भाजपला कंटाळली आहे आणि काँग्रेस विचार सरणीकडे मोठ्या प्रमाणात जनता वळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या भाजपला काँग्रेस हाच एक पर्याय असून बूथ स्तरावर काम करून पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेसचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे आणि काँग्रेस पक्षाला वैभव मिळवून देण्यासाठी काम करा, असे कार्यकर्त्यांना उद्देशून यावेळी नाना पटोले यांनी बोलून दाखवलं होत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार पुर्ण ५ वर्ष टिकणार असल्याचं सांगितलं असलं तरी, आता काँग्रेसची बदलती भूमिका महाविकास आघाडी सरकारपुढे संकट उभी करण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शेवटची सहमती काँग्रेसने दर्शवली होती. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Team Global News Marathi: