“पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?, अंजली दमानिया यांनी लगावला देशमुखांना टोला |

 

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी चौकशीसाठी ईडीने मुंबई येथील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी ईडीच्या कार्यालयाला पत्र लिहित जबाब हा व्हिडीओ कॉन्फरन्सीगच्या माध्यमातून नोंदवण्यात यावा अशी विनंती केली होते.

मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा, असं अनिल देशमुख म्हणाले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुखांवर जोरदार टीका केली आहे.

ईडीने बिलकुल अपवाद करू नये. कायदा हा सर्वांसाठी समानत आहे. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? भारतीय जनता पक्षाची ही चाल आहे, पण तुमचे हाथ देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय.

पुढे त्या म्हणतात की, तुमची प्रतीमा स्वच्छ आहे, तुम्ही काही केलं नाही तर घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. तुम्हाला माहितीये तुम्ही जे केलंय ते चुकीचं केलंय. सध्या माध्यमांमधून जे समोर आलं जी आकडेवारी समोर आली, झोन १ ते झोन ७ नं इतकं कलेक्शन केलं, झोन ८ ते झोन १२ ने इतकं कलेक्शन केलं, ते ऐकून राग येतो. मग कोरोना तुम्हाला आता आठवला, ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार केला तेव्हा कोरोना नाही का आठवला नाही असे म्हणत दमानिया यांनी देशमुखांना खडेबोल सुनावले आहे.

Team Global News Marathi: