शरद पवार-राजू शेट्टी भेट, आमदार अतुल भातखळकरांनी लगावला टोला |

 

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यविरोदहत शेतकरी मागच्या सात महिन्यापासून आंदोलन करत आहे. आज
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यविरोधात तहान मांडून बसले आहे. मात्र अद्याप केंद्राने कोणतंही पाऊल मागं घेतलं नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, पण मुख्यमंत्रांना भेटण्यास वेळ नाही, अशी तक्रार राजू शेट्टी यांनी शरद पवारांकडे केली होती. त्यावरून आता आमदार अतुल भातखळकरांनी राजू शेट्टींना टोमणा मारला आहे. ‘काय दिवस आलेत राजू शेट्टींवर, ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागत आहेत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच..’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलंही उत्तर आलं नाही, अशी तक्रार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यावर याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं आहे.

Team Global News Marathi: