येत्या चार – पाच दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

मुंबई : पुढील चार – पाच दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासह, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला आहे. झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात ढग साचण्याची शक्यता आहे

दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण झाले. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

येत्या ४ ते ५ दिवसांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघ गर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच एक ते दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. या कालावधीत विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर भारत आणि मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी हवामानात उल्लेखनीय बदल होत आहेत. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातच्या कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास असले तरी गुरुवारी सकाळी आणि दुपारी शहर व उपनगरात ढगाळ वातावरण होते. राज्यात काही ठिकाणी दुपारपर्यंत ढगाळ हवामान होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उकाडा वाढला होता.

येथे अवकाळी पावसाची शक्यता
शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा
शनिवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ

ग्लोबल न्युज नेटवर्क: