शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी सरकार देणार पैसे

 

। महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही काही भागात उसाचे चांगले उत्पादन घेतले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून ऊस तोडणीला मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. आता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आता सरकारकडून पैसे मिळणार आहेत.

समोर हाती आलेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्रीय कृषी मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या निर्णयामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीच्या प्रश्न काही प्रमाणात का असेना सुटण्याची शक्यता आहे.

शेतकरी मित्रांनो अनेकदा आपल्याला आपल्या गावाजवळील भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळत नाही. यामध्ये ऊस तोडणी यंत्र, गहू काढणी यंत्र, ट्रॅक्टर, रोटावेटर, JCB अशा यंत्राचा समावेश आहे. आपल्याला शेतीच्या कामाकरता हि यंत्रे वरचेवर लागत असतात. परंतु अनेकदा आपल्या गावातील यंत्र कुठेतरी कामावर असल्याने आपल्याला वाट पाहत बसावी लागते. मात्र आपल्याला आपल्या गावाच्या जवळील कोणत्याही भाडेतत्वावर सेवा देणाऱ्या यंत्राच्या मालकाला फोन करता येऊ शकतो. त्यामुळे आता ऊस तोडणी यंत्र, गहू काढणी यंत्र यांना शोधण्यासाठी तुम्हाला दुचाकीवरून आसपासची गावं पालथी घालण्याची अजिबात गरज नाही

या निर्णयासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे गडकरी यांनी विशेष आभार मानले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तोडणीसाठी यांत्रिकीकरणाच्या मदतीने आता शेतकरी आपला ऊस वेळेत साखर कारखान्यांकडे पाठवू शकतील आणि ऊसाचे वजन कमी होण्याच्या शक्यता टाळू शकतील तसेच वेळेवर मोबदला मिळवू शकतील

Team Global News Marathi: