देशात कोरोनाचा उद्रेक: गेल्या चोवीस तासात आजपर्यंतची सर्वात जास्त कोरोना वाढ

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या वाढत्या संख्येने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. गेल्या 24 तासातील वाढ ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून तब्बल 1 लाख 31 हजार 968 रुग्ण आढळले तर 780 जणांचा मृत्यू झाला. 61899 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत.

 

 

Total cases: 1,30,60,542
Total recoveries: 1,19,13,292
Active cases: 9,79,608
Death toll: 1,67,642

 

देशात सध्या 1.30 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यातील 1.19 कोटी लोकं बरे झाले आहेत. तर 9 लाख 79 हजार 608 कोरोनाग्रस्तांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1 लाख 67 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रिकव्हरी रेट हा 91.67 असून डेथ रेट हा 1.29 टक्के आहे.

देशातील 12 राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आ्हे. यात महाराष्ट्र्र, पंजाब, छत्तीसगढ़, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, तमिलनाडु, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश और केरल यांचा समावेश आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: